‘चर्चा होते तो मुख्यमंत्री होतोच असं नाही, पण काही…, ‘ काय म्हणाले विनोद तावडे

‘चर्चा होते तो मुख्यमंत्री होतोच असं नाही, पण काही…, ‘ काय म्हणाले विनोद तावडे

येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होत आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार की महाआघाडीचे सरकार येणार यावर चर्चा सुरु आहे. अलिकडे आलेल्या सर्वेमध्ये महायुतीचे सरकार येणार असे आकडे दाखविलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातून केंद्रात रमलेले भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा महायुतीला बहुमत मिळणार असे म्हटले आहे. त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येणार की नाही यावर देखील भाष्य केले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले की भाजपमध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ते शंभर टक्के होतेच असे नाहीच. राजस्थानमध्ये पाहा, भजनलाल मुख्यमंत्री झाले. त्यांचं नाव चर्चेच नव्हतं. मोहन यादव मध्यप्रदेशात. इतर राज्यातही असंच आहे. चर्चा होते ते मुख्यमंत्री होतातच असं नाही. पण काही अपवादही असतात असेही तावडे यावेळी म्हणाले.

आपल्याला आता राष्ट्रीय स्तरावर काम करताना आनंद मिळतोय. मी २० वर्ष आमदार होतो. पाच वर्ष ९ खात्याचा मंत्री होतो. अशी नऊ खाती की आधीच्या सरकारमध्ये ९ जण सांभाळत होते. नंतर परत आठ जण सांभाळत होती. अशी नऊ खाती मी एकत्रपणे सांभाळली आहेत. आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते त्याचा आनंद आहे. दिल्लीत राहावं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करावं वाटतं. ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र असे पुन्हा एकदा विनोद तावडे यांनी ठामपणे सांगितले आहे.

मुख्यमंत्री कोण ? हे निवडणुकीनंतर…

भाजप ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढत आहे. मात्र, महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहे. मुख्यमंत्री कोण काय हे निवडणुकीनंतर ठरवलं जाईल असेही विनोद तावडे यांनी सांगितले. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांचे पुढे काय करायचं त्यांच्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे केंद्रीय नेतृत्व ठरतील असेही तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना विनोद तावडे म्हणाले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल असेही तावडे यांनी सांगितले. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले. आमचे आमदार जास्त पण नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर लक्षात घेऊन करावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताचं पाहून निर्णय घ्यावा लागेल असेही तावडे यांनी सांगितले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;