राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय घेतली शपथ? शब्द न् शब्द जशाच्या तसा…

राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय घेतली शपथ? शब्द न् शब्द जशाच्या तसा…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात थेट शपथ घेतली आहे. कितीही काहीही झाली तरी आपण राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय मैत्री करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यासाठी त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. “महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष… जसं ते हे करतात ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाखवणार नाही, हे करणार नाही, अशी शपथ घेताना बोलतात तसं महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय”, अशी शपथ उद्धव ठाकरे यावेळी घेतात. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी ही शपथ घेतली.

“महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. तुम्ही ग्रामीण भागात जाऊन पाहा. मुलांच्या शिक्षणाची वाट लागलीय. वडील आत्महत्या करत आहे. अशा कुटुंबाकडे कोण पाहणार. हे सरकार आलं तर असे चालूच राहील”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या निवडणुकीला दादर-माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता “महाराष्ट्राच्या लुटारुंना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे अमित ठाकरे यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

“जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही. विषय संपला. माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. कोरोनात मी जबाबदारी घेतली ना. ते कुटुंब लुटलं जातं. त्या लुटारूंना अप्रत्यक्षपणे स्वप्नात पाठिंबा देणार नाही. माझं मत आहे. महाराष्ट्र प्रेमींनी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देऊ नये. महायुती महाराष्ट्र लुटतात. त्यांना पाठिंबा देणारे यांनाही पाठिंबा नाही”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

“माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर खिल्ली उडवली होती. आता त्याची जबाबदारी घेतली तर पोटात का दुखतं. माझी तेव्हा खिल्ली उडवली. माझ्या आजाराची नक्कल केली. त्यांना मी मदत करणार नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;