राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं? मनसेच्या सभेत एक खुर्ची रिकामी; उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला का दिले निमंत्रण

राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं? मनसेच्या सभेत एक खुर्ची रिकामी; उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला का दिले निमंत्रण

सध्या राजकीय धुराळा उडाला आहे. विधानसभा निवडणुकीत रणधुमाळी माजली आहे. प्रचारांच्या तोफा धडाडल्या आहेत. एकमेकांवर वैखरी टीका सुरू आहे. राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या राजकीय गोळाबेरजेत गुणाकार करण्याचा निर्धार अगोदरच व्यक्त केला आहे. महायुती सरकारला मनसेचा टेकू असणार असल्याची चर्चा रंगली आहे. अथवा महायुतीत मनसे मोठ्या भूमिकेत दिसू शकतो अशी पण एक चर्चा होत आहे. त्यातच आता मनसेच्या सभेला उद्धव ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला निमंत्रण दिल्याने खळबळ उडाली आहे.

कुणाला दिलं निमंत्रण?

राज ठाकरे यांची विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली आहे. या नवीन प्रकारामुळे मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर सडकून टीका सुरू असताना मनसेच्या मंचावर संजय राऊत कसे येतील आणि का येतील असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने संजय राऊत यांना का निमंत्रण दिले यावर खल सुरू आहे. अर्थात याला या वादाचीच किनार आहे.

संजय राऊत यांना मनसेचा भीमटोला

संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना विक्रोळी येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला निमंत्रण धाडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजकीय विचार कसे असावेत व विचारांची देवाण घेवाण कशी असावी या यासाठी त्यांना सभेला बोलावण्यात आल्याचा चिमटा मनोज चव्हाण यांनी काढला.

राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यानंतर हा वाद आता पेटला आहे. राज ठाकरे यांनी भाजपाला अनुकूल भूमिका घेतल्यापासून महाविकास आघाडीतून त्यांच्यावर तोफगोळे डागण्यात येत आहेत. आता मनसेने त्यांना सभेचे निमंत्रण देऊन मोठी खेळी खेळली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;