नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत…देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत…देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई आणि नवी मुंबई रस्ते मार्गाने प्रवास करणे मोठे दिव्यच असते. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जातो. परंतु राज्यात समृद्धी महामार्ग साकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन भागांना जलदगतीने मार्गाने जोडण्याचा प्लॅन सांगितला. नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत होणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी नवी मुंबईतील प्रचार सभेत बोलताना सांगितले. ‘कोस्टल रोड’ चा विस्तार भयंदर, विरार पालघरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी जपान सरकार 40 हजार कोटी कर्ज देणार आहे, असे फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

काय म्हणाले फडणवीस

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून ५४ हजार कोटी मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे. नवीन रस्ते होत आहे. आता या ठिकाणी विमानतळ आले तर या भागाचे चित्र बदलणार आहे. या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी होणाऱ्या वाढवण बंदरामुळे कोळी बंधू समृद्ध होतील. नरेंद्र मोदी यांनी निल क्रांती योजना आणली. त्यामुळे कोळी बांधवांना कर्ज मिळू लागले. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात बदल होऊ लागले, असे फडणवीस यांनी सांगितले.

मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यावर 15 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच शेती पंपासाठी बिल भरायची गरज राहणार नाही. त्यांचे वीज बिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे. तसेच आपले सरकार आल्यावर पूर्ण कर्ज माफी करू, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.

लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार

किती हुशार मुलगी असली तरी पैशांमुळे शिकवले गेले नाही. मात्र आता त्यांच्या शिक्षणाचा खर्च मंत्रालयातील त्यांचा मामा करतील. महिलांना बसमधून अर्ध्या दरात प्रवास करण्याची सवलत दिली. त्यामुळे तोट्यातील एसटी नफ्यात आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी काँग्रेससह अनेकांनी आम्हाला वेड्यात काढले. परंतु त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांना लाभ दिला. परंतु हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करू पाहत आहेत. या योजने विरोधात ते कोर्टात गेले आहे. सरकार आता लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;