महाराष्ट्रात ‘सुटकेस पॉलिटिक्स’…; बॅग चेकिंगवरून आरोप-प्रत्यारोप, अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

महाराष्ट्रात ‘सुटकेस पॉलिटिक्स’…; बॅग चेकिंगवरून आरोप-प्रत्यारोप, अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदाच्या या निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत. बॅग चेकिंगच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला गेले होते. यावेळी हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या. यामुळे उद्धव ठाकरे संतापले. या बॅग चेकिंगचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तसंच भाषणातही या मुद्द्यावरून महायुतीवर निशाणा साधला. या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासण्याचा व्हीडिओ शेअर केला. त्यानंतर यावरून राजकारण तापलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा माझ्या पण बॅगा तपासल्या आहेत. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या होत्या. निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार बॅगा तपासाचा आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्याच्या बॅगा पण तपासल्या होत्या. आमच्यासोबत पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासल्या पाहिजेत, असं अजित पवार म्हणालेत.

शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी देखील बॅग तपासण्यावरून नाराजी व्यक्त केली. सत्तेचा वापर कसा करायचा आणि विरोधकांना त्रास देणे त्यांनी ठरवलेला आहे. सत्ताधाऱ्यांचे एकंदरीत हाच दृष्टिकोन आहे त्यामुळे हे सहन करावा लागेल. त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते. याचा काय निवडणूक फार मोठा परिणाम होईल असा काही नाहीये, असं शरद पवार म्हणालेत.

अमोल कोल्हेंची बॅग तपासली

उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची देखील बॅग तपासली गेली. याचा व्हीडिओ अमोल कोल्हे यांनी शेअर केला. आज पुन्हा बॅग तपासली गेली. विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे. पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे!, असं अमोल कोल्हे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;