द्वेषाचं लोण आता थेट मंगल कार्यात; लग्न पत्रिकेवर मोदी-योगींचा फोटोसह छापले ‘बटोगे तो कटोगे’

द्वेषाचं लोण आता थेट मंगल कार्यात; लग्न पत्रिकेवर मोदी-योगींचा फोटोसह छापले ‘बटोगे तो कटोगे’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटोगे तो कटोगे’ ही घोषणा दिली. गेल्या आठवड्यात वाशिममधील सभेत त्यांनी हा नारा दिला. तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है’ अशी घोषणा दिली. या दोन्ही नाऱ्यांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे. तर दुसरीकडे द्वेषाचे लोण मंगल कार्यात सुद्धा दिसून येत आहे. एका भाजपा कार्यकर्त्याने लग्न पुत्रिकेवर ‘बटोगे तो कटोगे’ हा नारा छापला आहे. सोबत मोदी आणि योगी यांचे छायाचित्र सुद्धा छापले आहे.

लग्न पत्रिकेवर बटोगे तो कटोगेचा नारा

या लग्न पत्रिकेवर एका भाजप कार्यकर्तेने कटोगे तो बटोगे हा योगी आदित्यनाथ यांचा नारा छापला आहे. गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याने ही विवाह पत्रिका छापली आहे. महुआ तहसीलअंतर्गत येणार्‍या वांगर या गावात हा प्रकार समोर आला. या लग्न पत्रिकेवर बटोगे तो कटोगेचा नारा छापण्यात आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही फोटो छापण्यात आला आहे. ही पत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

हरयाणानंतर राज्यात भाजपाचा नारा

हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रासह झारखंडच्या प्रचारात भाजपने ही घोषणा केली आहे. तर उत्तर प्रदेशातील 9 जागांवर पोटनिवडणुकीतही हा नारा घुमला आहे. महाराष्ट्रात वाशीम येथील सभेत त्यांनी हा नारा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले. आता गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्याने त्याच्या भावाच्या लग्नपत्रिकेवर बटोगे तो कटोगे ही घोषणा छापली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक है तो सेफ है अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे.  हाच मुद्दा आता निवडणुकीच्य रिंगणात गाजत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;