Radhe Maa : बटोगे तो कटोगे’ वरून राधे माँ थेट मैदानात; कुणाला दिला पाठिंबा, म्हणाल्या काय?

Radhe Maa : बटोगे तो कटोगे’ वरून राधे माँ थेट मैदानात; कुणाला दिला पाठिंबा, म्हणाल्या काय?

गेल्या आठवड्यात वाशिम येथील सभेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटोगे तो कटोगे’ असा हुंकार भरला. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातच नाही तर देशभरात दिसले. अनेक राज्यातील नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला तर काहींनी त्यांच्या वक्तव्याला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्यानंतर लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, अशी भावनिक साद हिंदू मतदारांना घातली. त्यामुळे राज्यातील राजकारणात ध्रुवीकरणाचा कार्ड फेकल्या गेले. हिंदू्च्या एकगठ्ठा मतांसाठीच हा भावनिक खेळ सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. भाजपवर महाविकास आघाडीने जोरदार प्रहार केला. तर आता या वादात आध्यात्मिक क्षेत्रातील काही जणांनी उडी घेतली आहे. साधु-संतासोबतच आता राधे माँ यांनी सुद्धा या वक्तव्यावर त्यांचे जाहीर मत मांडले आहे.

बंटेंगे तो कटेंगेला जाहीर पाठिंबा

राधे माँ यांनी “बंटेंगे तो कटेंगे” या वक्तव्याला जाहीर पाठिंबा दिला. बटेंगे तो कटेंगे,आणि एक है तो सैफ है या भाजपच्या घोषणेला आणि नव्यान प्रचारात आलेल्या वक्तव्यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
जेव्हा झाडू गोळा होतो तेव्हा त्यात शक्ती असते, असे राधे माँ म्हणाल्या. राधे माँ या यापूर्वी पण अनेकदा वादात अडकल्या आहेत. त्यांच्या दरबारावर टीका झाली आहे. पण त्यांचा भक्त परिवार कमी होण्याऐवजी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधे माँ यांच्या भूमिकेने आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मोदी आणि योगी यांच्या मताशी सहमत

काल रात्री तुळशीपूजनानंतर राधे माँ म्हणाली, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी सभेत जे काही सांगीतले आहे, ते अगदी बरोबर सांगीतले आहे. बटोगे तो कटोगे, आणि एक है तो सेफ है हे देखील अगदी बरोबर आहे, कारण जेव्हा झाडू एकत्र येतो तेव्हा त्यात शक्ती असते. राधे माँ मुंबईच्या बोरिवलीमध्ये राहते आणि तिचे संपूर्ण कुटुंब मतदार आहे. राधे माँ आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

मतांच्या ध्रुवीकरणासाठी प्रयोग

राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी यावरून ध्रुवीकरणाचा प्रयोग करण्यात आला. त्यासोबतच आता जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसून येत आहेत. महिला मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी योजनांचा भडिमार करण्यात आला. तर जाहीरनाम्यात सुद्धा महिला, शेतकरी आणि बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर दिसून आला. त्यातच आता जातिय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;