मोठी बातमी! अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तर…, शरद पवारांच्या खास माणसाचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तर…, शरद पवारांच्या खास माणसाचं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यापाचं राजकारण रंगताना दिसत आहे. सध्या महायुतीच्या नेत्यांकडून ‘एक है तो सेफ है’ ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावर जोर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र  बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

‘एक है तो सेफ है या विधानाला आता अजित पवार विरोध करत आहेत, याला काही अर्थ नाही. त्यांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, त्यांच्या सोबत रहायचे आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा हे ठीक नाही, असं जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. ते लातूर जिल्ह्यातल्या चाकुर इथ बोलत होते. अहमदपूर मतदार संघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी सभा घेतली, त्या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.  राज ठाकरे यांनी काय काम केले आहे? ते त्यांनाच माहीत असंही जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत, आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 400  खासदार हवे असे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळ बेर दिसत दिसत आहे. मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती  त्यांच्याच लोकांनी सांगितली. घटना दुरुस्ती करण्याच पाप यांच्या मनात होतं असं टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;