अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान…सावरकर, बाळासाहेब ठाकरेंबाबत काँग्रेसने दोन शब्द…

अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान…सावरकर, बाळासाहेब ठाकरेंबाबत काँग्रेसने दोन शब्द…

Maharashtra Assembly Election 2024 BJP Manifesto: महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संकल्पपत्र रविवारी आले. भाजप संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात राहुल गांधी केवळ दोन शब्द चांगले बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात काँग्रेसचा कोणताही नेता दोन चांगले शब्द बोलेल का? असे आव्हान अमित शाह यांनी दिले. उद्धवजी तुम्ही कोणासोबत बसला आहात, जी लोक कलम ३७० ला विरोध करत आहे, जी लोक राम मंदिरास विरोध करतात, जी लोक सावकरसंदर्भात चांगले बोलू शकत नाही?संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएएस, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा, असे अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटले.

काश्मीरमध्ये प्रथमच राज्य घटनेनुसार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्र अनेक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत आहे. महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. मजबूत, समृद्ध आणि सुस्कृंत महाराष्ट्रासाठी संकल्पपत्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेनुसार काश्मीरमध्ये प्रथमच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय वेगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय श्रद्धांजली असू शकते.

गरीबांचे कल्याण, महिलांचा सन्मान

ज्या संकल्पपत्राचं लोकार्पण झाले ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचे नेतृत्व करत आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचे आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली.

आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान, गरीबांचे कल्याण करण्याचे म्हटले आहे. आम्ही महिलांचा सन्मान करण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत. आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. आमच्या संकल्पपत्रता मजबूत महाराष्ट्र कसा होईल हे पाहिलं आहे. निवडणुकीत आमचा मुकाबला आघाडीशी आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांना विचारधारेशी घेणेदेणे नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्यावर हल्ला

शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;