कांदा आणि लसण राजकीय समीकरणं बिघडवणार?; तुटवडा वाढल्याने झाली दरवाढ, ऐन हिवाळ्यात ग्राहकांना फुटला घाम

कांदा आणि लसण राजकीय समीकरणं बिघडवणार?; तुटवडा वाढल्याने झाली दरवाढ, ऐन हिवाळ्यात ग्राहकांना फुटला घाम

कांदा आणि लसणाने ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. मुंबईत कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या पेस्टने रोजच्या जेवणाला रंगत येते. ते रूचकर आणि चविष्ट लागते. पण या दोन महत्त्वाच्या जिन्नसच हरवल्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने किंमती वाढल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

असा वाढला भाव

मुंबईतील बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन – चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.

का झाला तुटवडा

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. परिणामी बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कांद्याचे भाव भडकणार?

कांद्याचे भाव आणखी महिनाभर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्याने हा तुटवडा जाणवत आहे. दिवाळीमुळे नाशिक परिसरात कांद्याची खरेदी-विक्री आठवडाभर बंद होती. यंदा पावसाने कांद्या मोठ्या प्रमाणात खराब केला आहे. खरीप कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम दिसून आला. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा आला आहे. आता या समस्येवर सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. नाहीतर कांदा हा विधानसभा निवडणुकीतील मुद्दा व्हायला वेळ लागणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;