RSS चे स्पेशल 65; महाविकास आघाडीच्या स्वप्नांना लावणार सुरुंग, विधानसभेच्या निवडणुकीत मोठा खेला

RSS चे स्पेशल 65; महाविकास आघाडीच्या स्वप्नांना लावणार सुरुंग, विधानसभेच्या निवडणुकीत मोठा खेला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचार आता रंगात येत आहे. पण महायुतीसाठी अजून एक संघटना मैदानात उतरली आहे. लोकसभेत खटके उडल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपसोबत फारकत घेतली होती. त्याचे चटके भाजपने सहन केले. भाजपने आरएसएससोबत लोकसभा निवडणुकीनंतर पॅचअप केले. आता विधानसभेत आरएसएस समीकरण जुळवून आणणार आहे. संघाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मोठी खेळी खेळली आहे. RSS ने खेला होबेचा नारा दिला आहे. हिंदू मतांची मोट बांधण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. काय आहे ही योजना? कसा होईल महायुतीला फायदा?

जागते रहो, सतर्क रहो

विधानसभेसाठी आरएसएसने 65 हून अधिक मित्र संघटनांची मोट बांधली आहे. त्यासाठी संघाने सतर्क रहो, जागते रहोचा नारा दिला आहे. विधानसभेत भाजपाला मदत करण्यासाठी संघाने तयारी केली आहे. हिंदूच्या मतांचा जागर करण्याची तयारी संघाने प्रत्येक मतदारसंघात केली आहे. आता मतदारसंघात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी पूरक आणि पोषक वातावरण तयार करण्याचे काम संघाने हाती घेतले आहे.

कोणाविरोधात नाही अभियान

टाइम्स ऑफ इंडियाने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, ‘सजग रहो’ आणि ‘एक है हो सुरक्षित है’ हे दोन अभियान सुरु आहेत. हे अभियान कुणाविरोधात नाही तर जाती जातीमधील मतभेद संपवण्यासाठी असल्याचा दावा करण्यात येत आहे. या अभियानात आरएसएसचे स्वंयसेवक आणि 65 हून अधिक गैर सरकारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात येत आहे. त्या मतदारसंघावर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्यात येत आहे, जिथे भाजपचा मतदार दूर गेला आहे.

या अभियानातंर्गत राज्यातील सर्वच भागात बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चाणक्य प्रतिष्ठान, मातंग साहित्य परिषद आणि रणरागिनी सेवाभावी संस्थांचा समावेश आहे. राज्यात संघाचे चार प्रांत आहेत. त्यातील प्रमुख स्वयंसेवक, कार्यवाह या अभियानासोबत असतील. शाखा स्तरावर पण बैठकी होतील.

या मुद्दांवर होणार चर्चा

या बैठकीत आरएसएस आणि भाजप समर्थक, इतर मतदार यांना पण सहभागी करून घेण्यात येणार आहे. या बैठकीत वोटबँक राजनीती, त्याचा हिंदूवर होणारा परिणाम, बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमानांची या निवडणुकीतील भूमिका आणि त्याचा प्रभाव तर सूडाचा राजकीय प्रवास अशा मुद्दावर चर्चा होणार असल्याचे समोर येत आहे. हिंदू जातींवरून विभाजीत होऊ नये यासाठी भाजपाने रणशिंग फुंकले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;