‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?

‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?

भाजपचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे कान टोचले. “कार्यालयाच्या उद्घाटनातून युतीचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे वातावरण निर्माण केले आहे, त्याप्रमाणे मी सर्वांचे अभिनंदन करतो. सुनील राणे म्हणाले की, बोरिवलीची 1978 पासूनची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, समाजाचे भले करा. माझी एकच विनंती आहे की, उरलेल्या दिवसात कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये. पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे आणि हे करायचे असेल तर स्वतःला लहान करावे लागेल. स्वतःला लहान करा आणि मग जगण्याचा आनंद पाहा. लोक म्हणतात, तुमच्यात ताकद आणि ऊर्जा कुठून येते. मी नेहमी लहानपणापासूनच काम करतो. प्रत्येकजण माझ्यापेक्षा मोठा आहे असे मानून मी काम करतो”, असं गोपाळ शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले.

पीयूष गोयल गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणाले

यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. “संजय उपाध्याय यांना आपण सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निवडून आणू. येत्या काही दिवसांत बोरिवली हा मुंबईतील आघाडीचा विधानसभा मतदारसंघ बनणार आहे. विधानसभा निवडणुकीत सुनील राणे, मी आणि गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने नवा विक्रम प्रस्थापित करू”, असं पीयूष गोयल म्हणाले.

पीयूष गोयल यांची मविआवर टीका

“महाविनाश आघाडीचे सरकार केवळ भ्रष्टाचारात गुंतले होते, अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व विकासकामे थांबवली होती”, अशी टीका पीयूष गोयल यांनी केली. “कोस्टल रोडने भाईंदरला जाणार आहे, म्हणजे आपण बोरिवलीहून निघू. 5-7 मिनिटांत कोस्टल रोडला टच करू आणि तिथून 20 मिनिटांत आपण थेट नरिमन पॉईंटला पोहोचू, हा कोस्टल रोडचा फायदा होईल”, अशी माहिती पीयूष गोयल यांनी यावेळी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;