महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना लाडकी बहीण योजना आणि लाडकी भाऊ योजना जाहीर केली. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आणि लाडक्या भावांना इंटर्नशिपच्या माध्यमातून 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. आता याच दोन योजनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडूनही आज आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यास सर्व बेरोजगार महिलांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यास सरकार सर्व बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल, अंस आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“आपण जे करतो ते खुलेआम. काळोखात काही करत नाही. आम्ही दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. जे करतो तेच करतो. जे बोलत नाही ते करत नाही. आपण मुलांना कौशल्य विकास देणार. मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहे. रोजगार मिळेपर्यंत काय करायचं हे पंचसूत्रीत आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणाला… बेरोजगारीची व्याख्या ठरवावी लागणार आहे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांची मदत करणार आहे”, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

‘बेरोजगार आपलं भविष्य’

“युवकांना का नाही आर्थिक मदत करायची? बेरोजगार आपलं भविष्य आहे. यांच्यामुळे तरुण नासत आहे. त्यांना उभारी देणार कोण. आपल्याला त्यांना उभारी देणार आहोत. संविधानाची प्रत राहुल गांधींनी दाखवलं. मी वर्षाताईला म्हटलं मलाही दे. खूप छान आहे, संविधान. वाचवायचं आहे संविधान. अजून पूर्ण वाचलेलं नाही. महाराष्ट्रातील निवडणूक त्यासाठीच आहे. संविधान बचाव फेक नरेटिव्ह वाटत असेल तर अदानीच्या घशात मुंबई घालण्याचे जे जीआर निघाले ते फेक आहे काय. अदानीच्या घशात जागा दिल्या जात आहे. मुंबई अदानीमय केली जात आहे. आमचं सरकार आल्यावर चुकीच्या निविदा काढल्या, ज्या सवलती अदानीला देऊन मुंबई नासवली जाते ते कंत्राट रद्द करू. आम्ही धारावीकरांना सुविधा दिल्याशिवाय घर दिल्याशिवाय राहणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;