‘…आव्हाडांचं थोबाड फोडणार का?’ अजितदादांवरील टीकेनंतर मिटकरींचा थेट सुप्रिया सुळे, शरद पवारांना सवाल

‘…आव्हाडांचं थोबाड फोडणार का?’ अजितदादांवरील टीकेनंतर मिटकरींचा थेट सुप्रिया सुळे, शरद पवारांना सवाल

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देत या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आव्हाडांचंं हे वक्तव्य अजित पवार यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं समर्थन आहे का? जर समर्थन नसेल तर मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जोडे मारून आव्हाडाचंं थोबाड फोडणार का? असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. सोबतच  आव्हाड यांच्या टीकेला मुंब्रामध्ये जाऊन उत्तर देणार असल्याचा इशाराही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणाले? 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. आता आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

‘ही पाकीटमारांची टोळी आहे, पाकीटमारांची. तुमच्यात हिंमत होती, अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही काकांनी वाढवलेली पार्टी चोरून ती माझी पार्टी आहे म्हणत देशात फिरत आहात,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;