शिंदे सरकार राहणार की जाणार? मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कोणाला? विधानसभा निवडणुकीच्या ताज्या सर्व्हेत काय?

शिंदे सरकार राहणार की जाणार? मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कोणाला? विधानसभा निवडणुकीच्या ताज्या सर्व्हेत काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सी-व्होटरचा सर्व्हे समोर आला आहे. या पाहणीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रिया वाढली असल्याचे समोर आले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची लोकप्रिया वाढली असताना जनता सरकारच्या कामावर नाराज असल्याचे दिसत आहे. परंतु लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे सर्व्हेत

सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये 51% लोक शिंदे सरकारच्या कामावर नाराज आहे. त्यांना बदल हवा आहे. परंतु 41% जनता सरकारवर समाधानी आहे. शिंदे सरकारसाठी जास्त टक्के लोक नाराज असणे हा अडचणीचा मुद्दा ठरु शकतो. परंतु यानंतर शिंदे सरकारला दिलासा देणारी बाब आहे. ती म्हणजे 52 लोक महायुती सरकारने विकासाची कामे चांगली केल्याचे म्हटले आहे. 21 टक्के लोकांनी सरकारचे काम सरासरी असल्याचे म्हटले आहे. 23 टक्के लोकांनी सरकारचे काम खराब असल्याचे म्हटले आहे. 51 टक्के लोकांनी विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे म्हटले आहे. परंतु 30 टक्के लोकांना बदल हवा आहे.

मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती?

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लढत सर्व्हेतून दिसत आहे. 27.5 लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास संमती दिली आहे. 23 लोकांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे आहे. 11 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. शरद पवार यांना 6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अजित पवार यांना 3 लोकांनी पसंती दिली आहे. सर्व्हेतून देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रियता कमी झाल्याचे दिसत आहे. कधीकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमांकावर होते. परंतु आता एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर?

मुख्यमंत्री शिंदे यांची ‘लाडकी बहीण योजना’ चा मोठा परिणाम लोकांवर दिसत आहे. या योजनेबाबत 45 टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे निवडणुकीत ही योजना ‘गेम चेंजर’ ठरु शकतो. मराठा आरक्षण मुद्याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;