Gopal Shetty : भाजपा नेते गोपाळ शेट्टी उमेदवारी मागे घेणार का? देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर म्हणाले….

Gopal Shetty : भाजपा नेते गोपाळ शेट्टी उमेदवारी मागे घेणार का? देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर म्हणाले….

बोरिवली भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे माजी आमदार, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. ‘मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे’ असं गोपाळ शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. मी वयाने व ते पदाने मोठे आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. “मी अनेकवेळा बोललो, वारंवार बोललो आहे. संघ परिवार, भाजपा कार्यकर्त्यांना पाऊल पुढे टाकण्याची शिकवण दिलेली आहे. समाजहितासाठी मी हे करतोय” असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

“पहिल्या दिवसापसून मी पक्ष सोडलेला नाही. पक्षाला काढावं लागतं. असा प्रसंग आल्यानंतर पक्षाला त्यांचं काम करावं लागतं. पक्षाने काढलं, तरी मी पक्ष सोडणार नाही. मी आजही ठाम आहे. मी जे काम करतोय ते पक्षहितासाठी आहे” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. “अशा प्रसंगात पक्षाला पक्षाच काम करावं लागतं. नाहीतर शिस्त राहणार नाही. मी पक्ष सोडलेला नाही. अन्य पक्षात जाणार नाही. भाजपाची धेय्य-धोरणं वेगळी आहेत. पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतोय. माझी लढाई त्यांच्याविरोधात आहे” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. “मी पक्ष हितासाठी जे करायचं ते करणार. माझं पाऊल पुढे पडलं, तर ते पक्ष हितासाठी असेल” असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

सातवेळा उमेदवारी देऊनही गोपाळ शेट्टी का लढतायत?

बोरिवलीमध्ये कमळ विरुद्ध गोपाळ शेट्टी असा सामना दिसेल का? त्यावर त्यांनी “माझ्या ह्द्यात कमळ आहे. डोक्यात कमळ आहे, ते कोणी काढू शकत नाही” असं उत्तर दिलं. गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत. काल भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली. पण त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी नकार दिला. भाजपाने मला न्याय दिला. पण आतापर्यंत चारवेळा बोरिवलीत बाहेरचा उमेदवार दिलाय. त्यामुळे बोरिवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलोय असं गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;