संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट… कुणी केला हल्लाबोल?

संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट… कुणी केला हल्लाबोल?

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  संजय राऊत यांनी मनसेबाबत केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केली आहे. ‘संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोलले ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हे हवेत विधान करत असतात, त्यामुळे या विधानानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं, याला देखील शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. संजय राउतांकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत. उगाचच येवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करू नये, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटानं काय सूत्र स्वीकारले हा त्यांचा त्यांचा विचार आहे. मात्र त्यांना त्यांच्या स्थानिक शिवसैनिकांना सोडून बाहेरच्यांना उमेदवारी द्यावी लागते. यावरूनच मूळ शिवसेना कोण आहे, निष्ठावंत कोण आहेत, हे यावरून सिद्ध होते. यामुळे शिवसेना ठाकरे गटातील लोकांनी मुख्य शिवसेनेकडे आले पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

सर्व पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत बंडखोरी सुरू असते. अनेक जण वेगवेगळ्या कारणातून उमेदवारी अर्ज भरत असतात.  प्रत्येक पक्ष हा संबंधित बंडखोरी करणाऱ्या वक्तीबाबत अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पक्षाला कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी सर्व स्तरातून आम्ही प्रयत्न करत असतो, असंही यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे. आता देसाई यांच्या टीकेला संजय राऊत काय  प्रत्युत्तर देणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;