Sandeep Deshpande : ‘हिरवे कंदिल लागले असते, तर तुम्ही…’, मनसेचा उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल

Sandeep Deshpande : ‘हिरवे कंदिल लागले असते, तर तुम्ही…’, मनसेचा उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाच आयोजन केलं आहे. शिवाजी पार्कमध्ये दिपावलीच्या निमित्ताने भव्य रोषणाई करण्यात आली आहे. हा दिपोत्सव पहायला येणार नागरिक इथला नजारा पाहून हरखून जात आहेत. अत्यंत नेत्रदीपक, भव्य अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीला मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाच आयोजन केलं जातं. आता विधानसभा निवडणुका असल्याने उद्धव ठाकरे गटाने या दिपोत्सवावर आक्षेप घेतला आहे. मनसेच्या दिपोत्सवाविरोधात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे. दिपोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून नियमबाह्य परवानगी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. मनसेकडून अचारसंहितेच उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार अनिल देसाई यांनी केली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे गटाच्या या आक्षेपाला उत्तर दिलं आहे.

‘उबाठाने या सिंपल प्रश्नाच उत्तर द्यावं’

“उद्धव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. हिरवे कंदिल लागले असते, तर विरोध केला असता का?” असा सवला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. ते वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवत आहेत. “मूळात उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? हा माझा सिंपल प्रश्न आहे” असं ते म्हणाले.

उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी

“भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी आहे” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;