भाजप सरकार येणार? राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपचे नाही तर…

भाजप सरकार येणार? राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपचे नाही तर…

राज्यात 2024 मध्ये भाजपचे सरकार येणार आहे. 2029 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरकार येणार आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने सगळ्यांना आश्चर्य वाटत होते. त्यावर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यात भाजपचे सरकार नाही तर महायुतीचे सरकार येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे देवेंद्र फडणवी यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नामांकन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार, बावनकुळे, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. आम्ही सर्व इश्यू संपवले आहेत. आता कोणताही इश्यू शिल्लक नाही. त्याचं प्रत्यंतर दिसेल. सर्व अर्ज मागे घेतले जातील. काही ठिकाणी एकमेकांच्या उमदेवारासमोर लोकं उभे आहेत. त्याबाबतही नीती तयार केली आहे. ज्यांनी तिकीट नसताना उमेदवारी भरली त्यांना अर्ज मागे घेण्यास लावणार आहे. पक्षांतर्गतही बंडखोरी झाली. त्यांना विश्वासात घेऊन त्यांनाही अर्ज मागे घ्यायला लावू. आमचे सर्व अर्ज वैध झाले आहे. दिवाळी दोन दिवस आहे. साधारण ४ ते ५ तारखेने जोराने प्रचार सुरू होईल.

मनसे सोबत आमची बोलणी सुरू आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे अजितदादा आहेत. काही मार्ग निघावा हा आमचा प्रयत्न आहे. आता राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रिय अस्मितेला भाजपचं समर्थन राहिलं आहे. पण त्यासोबत राष्ट्रीय अस्मिता आहे. त्याचा स्वीकार व्हावा. ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजे हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

आमचे २८८ मतदारसंघांपैकी ८ ते १० मतदारसंघात प्रॉब्लेम झाले. म्हणजे किती कोऑर्डिनेशन झालं. महाविकास आघाडीचं काय झालं. तुम्हाला समजलं का. समजलं तर मला नक्की सांगा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;