हे मी बाळासाहेबांकडून शिकलोय, सुप्रिया सुळेंचं उदाहरण देताना काय म्हणाले राज ठाकरे

हे मी बाळासाहेबांकडून शिकलोय, सुप्रिया सुळेंचं उदाहरण देताना काय म्हणाले राज ठाकरे

मनसेकडून अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज ठाकरे यांनी एका हिंदी वृत्तवाहिणी सोबत बोलताना महाराष्ट्रातील राजकारणावर मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘मी कोणासोबत कॉम्परमाईज करतोय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी जसा विचार करतो. मला वाटतं समोरच्याने पण तसा विचार ठेवायला पाहिजे. नसेल तर मग मी काही करु शकत नाही. पाच वर्षापूर्वी जेव्हा माझा भाचा आदित्य ठाकरे उभा होता. तिथे माझे ३८-३९ हजार मतं होतं. तिथे मी ठरवलं होतं की तो पहिल्यांदा लढत आहे म्हणून मी उमेदवार देणार नाही. तेव्हा मी गुड जेश्चर म्हणून ते केलं होतं. यासाठी मी कोणासोबत चर्चा केली नव्हती. मी आज उमेदवार नाही दिला तर तुम्ही भविष्यात उमेदवार नाही देणार अशी कोणाशी चर्चा केली नव्हती.’

पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांच्यासोबत माझे अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझा मुलगा जर उभा राहतोय तर त्यांना गुड जेश्चर म्हणून उमेदवार उभा करायचा नसेल तर करु नये पण उभा करायचा असेल तर करावा. मी कोणाकडे कॉम्प्रमाईज करायला गेलो नाही. अमितने ठरवलं आहे की, निवडणूक लढवायची आहे तर आज कोणी बोलले की मी उमेदवार नाही देणार. पण पाच वर्षानंतर तर देणारच आहे. मग आजच लढावे.

‘मी राजकारणा शिवाय कौटुंबिक संबंध देखील ठेवतो. इतरांना पण ते ठेवायला हवे. ही गोष्ट माझ्याकडे बाळासाहेबांकडून आली आहे. शरद पवार यांची मुलगी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवत होती. तेव्हा बाळासाहेबांनी तिला मतदान करायला सांगितले होते. कारण त्या पहिल्यांदा खासदार म्हणून जाणार होत्या. तेव्हा बाळासाहेबांनी शरद पवारांकडे काही मागितलं नव्हतं.’

‘काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा प्रतिभा पाटील या पहिल्यांदा राष्ट्रपती होणार होत्या. तेव्हा बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. राजकारणात काही चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे. मी माझ्या परिवाराबद्दल बोलू शकतो. इतरांच्या परिवाराबाबत मी कसं बोलेल. ते जसं विचार करतात तसा मी विचार करावा असं म्हणाल तर का मी तसं करु.’ असं ही राज ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;