बाबा सिद्धीकी प्रकरणात राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्यं, माझ्या हातात सरकार द्या..48 तासांत

बाबा सिद्धीकी प्रकरणात राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्यं, माझ्या हातात सरकार द्या..48 तासांत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकाचे पडघम वाजत आहेत. माजी मंत्री आणि एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. यावर आता विधानसभेत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर देखील भाष्य केले आहे.त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्या नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणातही मोठे भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना बाबा सिद्धीकी यांच्या हत्ये संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्याला उत्तर देताना ते म्हणाले की मुंबईतील बॉलीवूडमध्ये पूर्वी व्हायचे ते आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होत आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. त्यांना 48 तास देण्यात यावे, मुंबईला साफ करायला सांगावे, तर येथे सर्व साफ होऊन जाईल. एकदा पोलिसांना मोकळीक देऊन पाहावी,साफ सफाई हवी तर त्यांच्याशी बोलून पाहावे, त्यांना सर्व माहिती आहे. 48 तासांत सर्व साफ होऊन जाईल असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लॉ आमच्याकडे आणि ऑर्डर नाही मिळत – राज ठाकरे

आमच्याकडे लॉ आहे, परंतू ऑर्डर मिळत नाही. माझ्या हातात सरकार द्यावे.एकदा देऊन पाहावे. 48 तासांत सर्व काही साफ होईल, एकही गुन्हेगार राहणार नाही असे राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितले.

माजी मंत्री, एनसीपीचे नेते बाबा सिद्धीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या ( झिशान ) कार्यालयात ते गेले होते. तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात खळबळ उडाली होती. या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्या टोळीने घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. या गॅंगच्या हत्येतील सहभागाबाबत तपास केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;