12.50 कोटींची जंगम मालमत्ता, 4 कोटींचं कर्ज, अमित ठाकरे यांची संपत्ती नेमकी किती?

12.50 कोटींची जंगम मालमत्ता, 4 कोटींचं कर्ज, अमित ठाकरे यांची संपत्ती नेमकी किती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आज माहिम विधानसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रतिज्ञापत्रकाद्वारे आपल्या नावावर असलेल्या संपत्तीविषयी देखील माहिती दिली आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अमित ठाकरे यांच्यावर ४ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये इतकी रक्कम आहे.

अमित ठाकरे यांच्या ६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर शेअर्स ३ कोटी ९८ लाख रुपयांचे आहेत. तसेच त्यांची पोस्ट खात्यात 20 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे 3 तोळे सोने आहेत. तसेच अमित ठाकरे यांनी आपला ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह असा व्यवसाय असल्याचं म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे किती कोटींची संपत्ती?

अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे १ कोटी ७२ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर ५८ लाख ३८ हजार ५८७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मिताली ठाकरे यांच्या नावावर ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर त्यांनी म्युचूअल फंडमध्ये ५२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. मिताली ठाकरे यांच्याकडे ९ तोळे सोने आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर ७० हजार रुपये आहेत. तसेच मुलाच्या नावाच्या म्युच्यूअल फंडमध्ये ६० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मिताली यांची तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी आहे. सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स आहेत. तसेच त्यांचादेखील व्यवसाय हा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्हचा आहे.

अमित राज ठाकरे यांची मालमत्ता किती? थोडक्यात समजून घेऊयात

  • एकूण जंगम मालमत्ता – १२ कोटी ५४ लाख
  • एकूण स्थावर मालमत्ता- १ कोटी २९ लाख
  • एकूण कर्ज – ४ कोटी १९ लाख
  • रोख रक्कम – १ लाख ८ हजार
  • बँकेत असलेली रक्कम – ४० लाख ९९ हजार ७६३
  • ठेवी – ६ कोटी २९ लाख
  • शेअर्स -३ कोटी ९८ लाख
  • पोस्ट खाते – २० लाख
  • एकही गाडी नावावर नाही
  • गुन्हा एकही दाखल नाही
  • सोने- ३ तोळे
  • व्यवसाय – ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह

मिताली ठाकरे यांच्या नावे किती संपत्ती?

  • पत्नी मिताली ठाकरेच्या नावे – १ कोटी ७२ लाख
  • एकूण जंगम मालमत्ता – ५८ लाख ३८ हजार ५८७
  • ठेवी- ५ कोटी ९३ लाख
  • म्युचूअल फंड -५२ लाख
  • सोने -९ तोळे
  • मुलाच्या नावावर ७० हजार
  • मुलाच्या नावे म्युच्यूअल फंड – ६० लाख
  • तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी
  • सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स
  • व्यवसाय-ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;