निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, फडणवीसांची दिलजमाई? महायुतीमधील केंद्रीय मंत्र्याचा दावा

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, फडणवीसांची दिलजमाई? महायुतीमधील केंद्रीय मंत्र्याचा दावा

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे, महायुतीमधील तीन प्रमुख घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं अनेक विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांची देखील घोषणा केली आहे. मात्र महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला या विधानसभा निवडणुकीत एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही, यावरून रामदास आठवले चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

नेमकं काय म्हटलं आठवले यांनी?

‘मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, छोटा जरी पक्ष असला तरी जागा हव्या होत्या.  मागे फडणवीसांना पत्र दिले होते, किमान 5 जागा द्या अशी मागणी होती. जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे नॉमिनेशनसाठी जाणार नसल्याचं कार्यकर्ते म्हणत आहेत. 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठेच दिसत नाही. मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी हा आमचा आग्रह होता. महामंडळाची देखील मागणी केली आहे. जिल्हा परिषद, महापालिकेसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. मी महायुतीच्या बाजूनं आहे. मी केंद्रात मंत्री असल्यानं इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो.

त्यामुळे आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय, आम्ही सातत्यानं महायुतीसोबत आहोत. पण जागा मिळाल्या नाहीत. आम्हाला नांदेडमधील जागा हवी होती. अनेक जागा हव्या होत्या. आम्ही चार ते पाच जागांची अपेक्षा ठेवली होती. मात्र आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. मी फडणवीसांना पत्र लिहीलं आहे, त्यात मागण्या केल्या आहेत. आम्हाला एक एमएलसी देखील हवी आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्ष तुम्हाला मजबूत करण्याऐवजी खिळाखिळा करत आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं, उद्धव ठाकरे हे महायुती सोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटलेच नसते. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;