‘आमच्यापैकी कुणाची बायको हिरोईन नसल्यामुळे टाळलं असावं’, शरद पवार गटाच्या नेत्याची उद्विग्न प्रतिक्रिया

‘आमच्यापैकी कुणाची बायको हिरोईन नसल्यामुळे टाळलं असावं’, शरद पवार गटाच्या नेत्याची उद्विग्न प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अणुशक्तीनगरमधून फहाद अहमद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. फहाद अहमद यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार यांच्या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. अणशक्तीनगरचे शरद पवार गटाचे स्थानिक नेते निलेश भोसले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. कार्यकर्त्यांशी बोलून पुढची दिशा ठरवणार असल्याचं निलेश भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, “आमच्यापैकी कुणाची बायको हिरोईन नसल्यामुळे आम्हाला टाळलं असावं”, असं वक्तव्य निलेश भोसले यांनी केलं आहे. अणुशक्तीनगरमध्ये शरद पवार गटाने ज्या फहाद अहमद यांना उमेदवारी दिली ते प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. अहमद यांचा आजच समाजवादी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. अहमद यांनी याआधी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या उमेदवारीने शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतोय.

“आम्ही जेवढ्या इच्छुकांनी अर्ज केला होता, आमच्यापैकी कुणाची बायको हिरोईन नसल्यामुळे आम्हाला टाळलं असावं. पण आम्ही फक्त प्रमुख कार्यकर्ते आहोत. आमच्या पाठिचा कणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आम्ही जोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांशी बोलत नाही ते कार्यकर्ते आमच्या आमच्याशी बोलत नाहीत, ते आम्हाला दिशा ठरवून देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे निलेश भोसले यांनी दिली.

“आम्ही निष्ठेने शरद पवार यांच्यासोबत काम केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 40 आमदार गेले, मंत्री तरी आम्ही डगमगलो नाही. आमच्या मनामध्ये भावना होती की, ज्यावेळेस चांगले दिवस येतील, संधीचे दिवस येतील तेव्हा आमच्यापैकी कुणा एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा विचार केला जाईल. पण अर्ध्या तासापूर्वी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश झाला, त्यानंतर त्याला थेटपणे निवडणुकीचं तिकीट दिल्याची चर्चा होत असेल तर ते दुर्दैवी आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्याला ते आवडणारं नाही”, अशी भूमिका निलेश भोसले यांनी मांडली.

फहाद अहमद यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर फहाद अहमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “उमेदवारी मिळाल्याचा आनंद नाही तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. पक्ष, व्यक्ती आणि चिन्हाच्या पलिकडे जावून आज महायुती सरकारच्या विरोधात जे वातावरण आहे त्याविरोधात मजबुतीने काम करायचं आहे. मी ज्या कुटुंबातून येतो अशा व्यक्तीला शरद पवारांनी विश्वास दाखवला आहे. मी त्यांनी ठेवलेल्या या विश्वासाला आयुष्यभर विसरणार नाही आणि पूर्ण मेहनतीने त्या लोकांच्या विरोधात लढणार ज्या लोकांनी शरद पवारांनी आयुष्यभर मेहनत केलेल्या पक्षाचं चिन्हं हिसकावलं आहे. आम्ही शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह परत मिळवून देत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाहीत”, असं फहाद अहमद म्हणाले.

यावेळी फहाद अहमद यांना पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवारांचा पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. त्यांच्या पक्षातील अनेक जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. लोकशाही आहे. लोकशाहीत सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे. पण पक्ष जो निर्णय घेतो तो सर्वांना मान्य असतो. मलाही तेच मान्य होता. सर्वजण तो निर्णय मान्य करतील. मी सर्व पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेईन. दोन-तीन दिवसांत ते सर्वजण माझ्यासोबत असतील. त्यांचा संघर्ष आणि माझा संघर्ष वेगळा नाही. आधी दुसऱ्या माळ्यावर बसायचो आणि पहिल्या माळावर बसतो. एकच विचारधारा आहे. काही अंतर नाही. आधी आणि आताही देशाला तोडणाऱ्या विचारधारेविरोधात लढत आहे”, अशी प्रतिक्रिया फहाद अहमद यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;