मविआ, महायुतीचं टेन्शन वाढलं, तिकीट न मिळाले सर्वपक्षीय इच्छुक एकत्र , घेतला मोठा निर्णय

मविआ, महायुतीचं टेन्शन वाढलं, तिकीट न मिळाले सर्वपक्षीय इच्छुक एकत्र , घेतला मोठा निर्णय

विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून आतापर्यंत अनेक मतदारसंघात आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी इच्छूक असलेल्या उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आता सर्वच पक्षांसमोर असणार आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. इच्छूक असूनही ज्या नेत्यांना या दोन मतदारसंघात डावलण्यात आलं, उमेदवारी मिळाली नाही ते सर्वपक्षीय नेते आता एकत्र आले आहेत. या सर्व इच्छुकांमधून निवडण्यात आलेला एक उमेदवार आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात आपला अर्ज अपक्ष दाखल करणार आहे.

उद्या नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर सर्व पक्षीय इच्छुकांकडून जोरदार शक्तिपदर्शन करण्यात येणार आहे. या दोन्ही मतदारसंघात इच्छुकांमधून एक सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. या मतदारसंघात बनवलेली कोर कमिटी उमेदवाराबाबत निर्णय घेणार आहे. या मतदारसंघात सक्षम उमेदवार देऊन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला पाडण्याचा निर्धार या इच्छुकांनी केला आहे. दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी एक इच्छुक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर इतर जण त्यांना पाठिंबा देणार आहेत. यामुळे या मतदार संघात स्थानिक भूमिपुत्राचा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.

नाराजीचा फटका 

दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच नाही तर अनेक मतदारसंघात नाराज इच्छुकांचा पक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यावेळी भाजपच्या विरोधामुळे नवाब मलिक यांचं तिकीट कापण्यात आलं, त्याऐवजी त्यांची मुलगी सना खाना यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अजूनही मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, आपण येत्या 29 ऑक्टोबरला फॉर्म भरणार आहोत, मी निवडणूक लढणार आणि जिंकणार असं मलिक यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;