राजकारणातील टरबुज्या… तुम्हाला समजेल मी कुणाबद्दल बोलतोय, अनिल देशमुख करणार आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, ट्विट प्रचंड व्हायरल
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या तोंडावर तोफगोळे जमा करून ठेवले आहे. त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकाने विधानसभेच्या राजकीय मैदानात एंट्री घेतली आहे. या पुस्तकातून एक एक तोफगोळा सत्ताधाऱ्यांच्या खेम्यात डागण्यात येणार आहे. एक दोन दिवसांत या पुस्तकाचे धमाके राज्याच्या राजकारणात ऐकू येतील. त्यातच अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. राजकारणातील टरबुज्या या नावाने केलेले ते ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे त्या ट्विटमध्ये?
माझ्याविरोधात राजकीय कट करण्यात आला
‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात अनिल देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मागे केंद्र सरकारच्या आशीवार्दाने ईडी, सीबीआय मागे लागली. मला जेलमध्ये टाकण्यात आले. कशा पद्धतीने माझ्याविरोधात राजकीय कट करण्यात आला. याची सर्व माहिती मी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात सविस्तर दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. सरकारचा एक दूत समित कदम आपल्यावर सातत्याने दबाव आणत होता. खोटं शपथपत्र सादर करण्यास आपल्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण दबावाला झुकलो नाही. त्यामुळेच या दिव्यातून जावे लागल्याचा दावा देशमुखांनी केला आहे.
काय आहे ते ट्विट?
“महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या… लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय. माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.” असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय!
माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय.
ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत… pic.twitter.com/enRNTkiU8Y
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 27, 2024
चंद्रकांत दादांनी दिले होते आव्हान
नुसत्या गोट्या फेकण्यात काय अर्थ नाही, पुरावे द्या, असे आव्हान चंद्रकांत दादा पाटील यांनी अनिल देशमुख यांना दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांचे हे ट्विट समोर आले आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना दादांनी नुसत्या गोट्या फेकण्यात काय अर्थ नाही, पुरावे असतील तर द्या असे आव्हान दिले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List