MNS Assembly Candidate List : विधानसभेसाठी मनसेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

MNS Assembly Candidate List : विधानसभेसाठी मनसेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, तर चार नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपली पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या पाचव्या यादीमध्ये एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी  

मेहकरमधून भैय्यासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव जामोद अमित देशमुख, उमरेड शेखर टुंडे, गंगाखेड रुपेश देशमुख, सोलापूर मध्यमधून नागेश पासकंटी, परांडा राजेंद्र गपाट, फुलंब्री बाळासाहेब पाथ्रीकर,उस्मानाबाद देवदत्त मोरे, बीड सोमेश्वर कदम, काटोल सागर दुधाने,श्रीवर्धन फैझल पोपेरे आणि राधानगरीमधून युवराज येडुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अमित ठाकरेंसाठी शिवसेना नेत्यांची फिल्डिंग 

दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेच्या पहिल्याच यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. या मतदारसंघातून शिनसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे रिंगणात आहेत. मात्र अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे,  परंतु मी माघार घेणार नसून, येत्या 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;