हा एबी फॉर्म घ्या… अन् कुणी लढवायचं तुम्हीच ठरवा; उद्धव ठाकरेंनी कुणाला सांगितलं असं?

हा एबी फॉर्म घ्या… अन् कुणी लढवायचं तुम्हीच ठरवा; उद्धव ठाकरेंनी कुणाला सांगितलं असं?

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. काही जागा वगळता  महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटप देखील जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, महाविकास आघाडीमध्ये दहिसर विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. मात्र या जागेवर घोसाळकर कुटुंबातून विनोद घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर असे दोन सदस्य निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.

यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी सही करून ब्लँक एबी फॉर्म घोसाळकर कुटुंबीयांना दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोसाळकर कुटुंबीयांना आज कोरा एबी फॉर्म देण्यात आला आहे. फॉर्मवर कोणाचेही नाव नाही. निवडणूक कोणी लढवायची याचा निर्णय तुम्हीच घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निवडणूक कोण लढणार याबाबत घोसाळकर कुटुंब निर्णय घेणार आहे.  तेजस्विनी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर हे दोघेही दहिसर विधानसभेसाठी इच्छूक आहे. त्यामुळे आता इथून कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र अजूनही महाविकास आघाडीमधील जागा वाटप निश्चित होत नसल्याचं समोर आलं आहे. अजूनही विधानसभेच्या काही मतदारसंघात महाविकास आघाडीमधील तिढा कायम आहे. सुरुवातील 85-85-85 चा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र उर्वरीत जागांवरील तिढा कायम होता. आता 90-90-90 चा नवा फॉर्म्युला समोर येत आहे, तर उर्वरीत 18 जागा या मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;