‘मी निवडणूक लढणार लढणार आणि लढणारच…’ नवाब मलिक ठाम; राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांचे आदेश धुडकावले

‘मी निवडणूक लढणार लढणार आणि लढणारच…’ नवाब मलिक ठाम; राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांचे आदेश धुडकावले

मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र नवाब मलिक हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नवाब मलिका यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी हात जोडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यामध्ये बंददाराआड चर्चा झाली.

या बैठकीत नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ  नेत्यांकडून निवडणूक लढवू नका अशी विनंती करण्यात आली, पण तरी देखील नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या भेटीनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून, मी निवडणूक लढणार, लढणार आणि लढणारच. 29 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध करण्यात आला. भाजपच्या विरोधामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र मुलीला तिकीट मिळाल्यानंतर देखील नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, 29 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;