BJP Assembly candidate list : भाजपकडून विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पडळकरांना उमेदवारी

BJP Assembly candidate list : भाजपकडून विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पडळकरांना उमेदवारी

मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवरांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी महायुतीमध्ये आघाडी घेत भाजपनं सर्वप्रथम विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये भाजपनं 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जतमधून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून आतापर्यंत पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण 121 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान दुसऱ्या यादीचं वैशिष्ट म्हणजे या यादीमध्ये पक्षाकडून मुंबईतील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये.

भाजपची दुसरी यादी 

राम भदाणे- धुळे ग्रामीण

चैनसुख संचेती – मलकापूर

प्रकाश भारसाखळे – अकोट

विजय अग्रवाल – अकोला पश्चिम

श्याम खोडे – वाशिम

केवलराम काळे – मेळघाट

मिलिंद नरोटे – गडचिरोली

देवराम भोंगले – राजुरा

कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी

करण देवताळे – वरोरा

देवयानी फरांदे – नाशिक मध्य

हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

कुमार आयलानी – उल्हासनगर

रवींद्र पाटील – पेण

भीमराव तापकीर – खडकवासला

सुनील कांबळे – पुणे छावणी

हेमंत रासने – कस्बापेठ

रमेश कराड – लातूर ग्रामीण

देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य

समाधान आवताडे – पंढरपूर

सत्यजित देशमुख – शिराळा

गोपीचंद पडळकर – जत

भाजप मुंबईमध्ये एकूण आठरा जागा लढवणार आहे, त्यापैकी 14 जागांवर भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर अद्याप चार जगांवर कोणत्याही उमेदवराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. भाजपसोबतच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;