Chandrakant dada Patil : नुसत्या गोट्या काय फेकताय, पुरावे द्या, पुरावे..चंद्रकांत दादांचं अनिल देशमुखांना ओपन चॅलेंज

Chandrakant dada Patil : नुसत्या गोट्या काय फेकताय, पुरावे द्या, पुरावे..चंद्रकांत दादांचं अनिल देशमुखांना ओपन चॅलेंज

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांचं ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकाने विधानसभेच्या राजकीय मैदानात एंट्री केली आहे. या पुस्तकात धक्कादायक दावे आहेत. या पुस्तकातून अनेकांचा पर्दाफाश करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. या पुस्तकात काय असले याची उत्सुकता ताणलेली असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यात शा‍ब्दिक युद्ध छेडल्या गेले आहे. आता चंद्रकांत दादांनी अनिल देशमुखांना असा चिमटा काढला आहे.

माझ्याविरोधात राजकीय कट

केंद्र सरकारच्या आशीवार्दाने आपल्या मागे ईडी, सीबीआय मागे लागली. मला जेलमध्ये टाकण्यात आले. कशा पद्धतीने माझ्याविरोधात राजकीय कट करण्यात आला. याची सर्व माहिती मी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात दिल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. सरकारचा एक दूत समित कदम आपल्यावर सातत्याने दबाव आणत होता. खोटं शपथपत्र सादर करण्यास सांगत होता, असा आरोप देशमुखांनी केला.

चंद्रकांत दादा पाटील यांची टीका

नुसत्या गोट्या फेकण्यात काय अर्थ नाही, पुरावे द्या. चंद्रकांत पाटील यांची अनिल देशमुख यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. नुसत्या गोट्या फेकण्यात काय अर्थ नाही, पुरावे असतील तर द्या असे आवाहन भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर दिले आहे.

मनोज जरांगे यांना केला असा सवाल

मनोज जरांगे पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी सवाल विचारला आहे. आमचे चुकले काय? कधीं न दिलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले , उध्दव ठाकरे यांच्या काळात गेले एकनाथ शिंदेंच्या काळात दिले हे चुकलं का? राज्यात 78 हजार कुणबी नोंदी सापडल्या. या सगळ्यात आमची चूक झाली का? जरांगे समजून घेणार नसतील तर सामान्य मराठा समाज समजून घेईल. मनोज दादा खऱ्याला खरे म्हणायला शिका. आम्ही आजूनही कागदपत्रे घेऊन चर्चेला बसायला तयार आहे. आमचे चुकले काय हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी जरांगे पाटील यांना दिले.

त्यांनी संगमनेर येथील घटनेवर पण प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीने म्हणणे हा त्याचा व्यक्तीचा दोष असू शकतो. ते आमच्या पक्षाचे ते कल्चर नाही. जे कोण देशमुख बोलले आहेत त्याना सर्वांनी समजावून सांगितले आहे. आपल्या बोलण्यात सर्वांनीच आदर व्यक्त केला पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यात पराभूत 17 लोकसभामध्ये 130 विधासभेत भाजपाच पुढे आहे. त्यामुळे आम्ही पिछाडीवर आहोत याबाबत विरोधक हवेत आहे. याचा आम्हालाच फायदा होईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;