Mahayuti Seat Sharing : हत्ती गेला नि शेपूट अडकले; महायुतीच्या जागा वाटपात हीच एक मेख, इतक्या जागांवर दिसतोय पेच

Mahayuti Seat Sharing : हत्ती गेला नि शेपूट अडकले; महायुतीच्या जागा वाटपात हीच एक मेख, इतक्या जागांवर दिसतोय पेच

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने जागा वाटपांचा घोळ होऊ दिला नाही. लोकसभेचा पक्का अनुभव गाठीशी असल्याने जागा वाटपात महायुतीने आघाडी घेतली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपातील मतभेद मिटवले आहेत. दिल्ली दरबारी काल झालेल्या बैठकीत तीनही पक्षांनी जागा वाटपावर खल पूर्ण केला. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील 288 विधानसभा जागांमधील 278 जागांवर (Maharashatra Vidhansabha Election 2024) उमेदवारी निश्चित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तरीही 10 जागांवर अजून एकमत झालेले नाही. त्यावर पण लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या 10 जागांचा पेच सोडवण्यात येईल असे फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

10 जागांचा घोळ लांबणार नाही

दिल्ली येथे अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक झाली. यावेळी तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाली. त्यात जवळपास 278 जागांवर एकमत झाले. तर 10 जागांवर आतापर्यंत निष्कर्ष निघाला नसल्याचे ते म्हणाले. या दहा जागांवर आता लवकरच मार्ग काढण्यात येणार आहे. 1-2 दिवसांत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजप आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील (BJP-Shivsena-NCP) बैठकीत केवळ 10 जागांवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. एक-दोन दिवसात त्यावर तोडगा निघेल. महायुती आता लवकरच सर्व जागांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीला काढला चिमटा

महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. लोकसभेत जागा वाटपातील घोळ झाल्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. विधानसभेपूर्वी तीनही पक्षांनी याविषयी मोठी खबरदारी घेतली. आतापर्यंत भाजपने 99, शिवसेनेने 40 तर राष्ट्रवादी पक्षाने 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) तीनही पक्षांचा 85-85-85 फॉर्म्युल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला. या तीनही पक्षांचे गणित मग 270 कसं होत आहे, असा टोला त्यांनी लगावला. हे गणित एखादा तज्ज्ञच सोडवू शकतो, अशी मिष्कील टिपण्णी त्यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;