मोठी बातमी! अमित शाहांना वेगळीच चिंता, महायुतीच्या बैठकीत काय ठरलं?

मोठी बातमी! अमित शाहांना वेगळीच चिंता, महायुतीच्या बैठकीत काय ठरलं?

राज्यात विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही राज्यात काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत. ज्या मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. त्या मतदारसंघावर महायुतीमधील एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केला आहे. या मतदारसंघात उमेदवार ठरत  नसल्यामुळे आता हा तिढा दिल्लीच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे.

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये अमित शाह यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा इच्छुकांकडून होणारी बंडखोरी टाळण्यावर भाजपचा भर असणार आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा.. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढ, राज्यात महायुतीच सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा, बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवाव, अशा सूचना राज्यातील नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत .

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी महायुतीचा एकच जाहीरनामा असणार आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळा जाहीरनामा सादर करणार नाहीत. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित जाहीरनामा पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्र प्रचार करणार नसून एकत्रच प्रचार करणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;