शिवडी विधानसभेबाबत ठाकरे गटाकडून सस्पेंस कायम, कोणाला मिळणार उमेदवारी?

शिवडी विधानसभेबाबत ठाकरे गटाकडून सस्पेंस कायम, कोणाला मिळणार उमेदवारी?

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ६५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण शिवडी मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नसल्याने सस्पेंस वाढला आहे. शिवडी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. कारण या मतदारसंघातून अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघेही इच्छूक आहेत. दोन्ही समर्थकांमध्ये यावरुन चांगलाच पोस्टर वॉर रंगला होता. पण जो मातोश्रीचा आदेश असेल तोच शिवडीचा उमेदवार अशा आशयाचे पोस्टर देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांचे समर्थक आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानसभेत निष्ठेची मशाल धगधगणार असं अजय चौधरी यांच्या समर्थकांनी म्हटलं होतं. तर संघर्षात साथ जनतेची मला भिती नाही विरोधकांची असे पोस्टर सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून व्हायरल करण्यात आले होते.

अजय चौधरी हे ठाकरे गटाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून लोकसभा समन्वयक म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2009 ची निवडणूक वगळता शिवडीतून शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2009 मध्ये मनसेकडून बाळा नादंगावकर यांनी येथे विजय मिळवला होता.

मनसेकडून बाळा नांदगावकर यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. बाळा नांदगावकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलीये. लोकसभा निवडणुकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य कमी झाल्याने अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथए सुधीर साळवी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;