ठाकरे गटाचे 53 शिलेदार ठरले, कुणाला तिकीट तर कुणाचा पत्ता कट? आघाडीच्या शिलेदारांची आज घोषणा

ठाकरे गटाचे 53 शिलेदार ठरले, कुणाला तिकीट तर कुणाचा पत्ता कट? आघाडीच्या शिलेदारांची आज घोषणा

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काथ्याकुट सूरू आहे. महायुतीने जागा वाटपात खरी आघाडी घेतली आहे. सामोपचाराने महायुतीने जागा वाटपातील तिढा सोडवला. इकडे महाविकास आघाडीत युती व्हायला अजून ही वेळ घेण्यात येत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील संबंध टोकाचे ताणल्या गेल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात ताणाताणीमुळे जागा वाटपाचं त्रांगडं सुटेल की नाही हे थोड्याच वेळात समोर येईल. मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर या धामधुमीत ठाकरे गटाने आतापर्यंत 53 उमेदवारांची नावं अंतिम केल्याची माहिती समोर येत आहे.

53 उमेदवारांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल

गुरूवारपासून विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्या. त्यानंतर तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून आतापर्यंत 53 उमेदवारांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे समोर येत आहे. ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात आले आहे. या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर निवडणुकीसंबंधी या उमेदवारांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने एकूण आतापर्यंत 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

कुणाचा पत्ता कट, कुणाला देव पावणार?

ज्या जागांवर वाद नाही, तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून आतापर्यंत 53 उमेदवारांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे समोर येत आहे. आता या जागा वाटपात कुणाचा पत्ता कट, कुणाला देव पावणार हे लवकरच समोर येईल.

आज जागा वाटप जाहीर होणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात महाविकास आघाडीच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे समोर आले. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाने काँग्रेस हायकमांडकडे याविषयीची तक्रार केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रभारी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आज थोरात आणि शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची दुपारी भेट घेणार आहेत. त्यात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;