एकनाथ शिंदेंविरोधात मनसेचा हुकमी एक्का? राज ठाकरे यांनी केले या उमेदवाराचे नाव घोषित

एकनाथ शिंदेंविरोधात मनसेचा हुकमी एक्का? राज ठाकरे यांनी केले या उमेदवाराचे नाव घोषित

Thane Vidhansabha 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचवेळी विविध राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. यंदाच्या निवडणुकीत त्रिरंगी, चौरंगी लढत होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत होत असताना राज ठाकरे यांचा मनसे पक्षही पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली होती. आता सोमवारी डोंबिवलीत आल्यावर राज ठाकरे यांनी दोन नावे जाहीर केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गडात मनसेचा हुकमी एक्का म्हणून समजले जाणारे अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी येथून निवडणूक लढवतात. त्यावेळी मनसे ठाण्यातील उमेदवार म्हणून अविनाश जाधव यांचे नाव जाहीर केले. आता अविनाश जाधव ठाण्यातील कोणत्या मतदार संघात उभे राहणार ते मनसेची यादी आल्यावरच स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राज ठाकरे

डोंबिवलीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मनसेची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. यादीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. परंतु आज मी आलोच आहे तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच येत्या २४ तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फार्म भरण्यासाठी मी येणार आहे. मला आठ वाजता मुंबईत पोहचायचे आहे, त्यामुळे मी आता जास्त काही बोलणार नाही.

एकमेव आमदार राजू पाटील यांना पुन्हा उमेदवारी

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार विजयी झाले होते. कल्याण ग्रामीण मतदार संघातून राजू पाटील यांना विजय मिळाला होता. त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. आगरीबहुल असा हा मतदारसंघ आहे. आता या ठिकाणी पुन्हा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील विजयी होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;