Bjp First List Maharashtra: हरियाणा नव्हे तर महाराष्ट्र ‘पॅटर्न’, भाजपच्या यादीत केवळ दहा उमेदवार नवीन, 89 जुन्यांना संधी

Bjp First List Maharashtra: हरियाणा नव्हे तर महाराष्ट्र ‘पॅटर्न’, भाजपच्या यादीत केवळ दहा उमेदवार नवीन, 89 जुन्यांना संधी

Bjp First List Maharashtra:भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये सत्ता मिळाली. सर्व एग्झिट पोल फोल ठरवत भाजपने स्वबळावर सत्ता मिळावल्याचा धसका महाराष्ट्रातील आमदारांना घेतला होता. हरियाणा पॅटर्ननुसार महाराष्ट्रातही भाजप विद्यमान आमदारांना तिकीट कापणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांऐवजी नव्या उमेदवारांना संधी दिली जाईल, तसेच जे तीन वेळा आमदार झाले आहेत, त्यांना संधी नाकारली जाईल, असेही म्हटले जात होते. परंतु भाजपने हरियाणा पॅटर्न न राबवता महाराष्ट्र पॅटर्न तयार केला. यामध्ये पुन्हा जुन्या आमदारांवरच विश्वास व्यक्त केला. केवळ दहा ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहे.

भाजप आमदारांनी घेतला होता धसका

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसला. पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची जबाबदारी आमदारांवर टाकली जाणार असल्याची चर्चा होती. तसेच राज्यातील सामाजिक आणि जातीय समीकरणे लक्षात घेऊन तिकीट वाटप करण्यात येईल, असे म्हटले जात होते. यामुळे भाजपच्या यादीत चमत्कार घडेल, अनेक जणांना धक्का बसले, असे म्हटले जात होते. परंतु भाजपकडून तसे काही झाले नाही. यामुळे विद्यामान आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदार संघांमधून भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. उत्तर सोलापूरमधून पुन्हा एकदा विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रताप अडसड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांना गोंदिया विधानसभेतून पुन्हा संधी दिली आहे. हिंगोली विधानसभेमधून तान्हाजी मुटकुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे.

नवीन उमेदवार

  1. प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
  2. विनोद शेलार – मालाड पश्चिम
  3. राजेश बकाने – देवळी (गेल्यावेळी अपक्ष)
  4. श्रीजया चव्हाण – भोकर
  5. शंकर जगताप – चिंचवड
  6. विनोद अग्रवाल ( गेल्यावेळी अपक्ष) – गोंदिया
  7. अनुराधा चव्हाण – फुलंबरी
  8. सुलभा गायकवाड ( आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी) – कल्याण पूर्व
  9. राहुल आवाडे – इचलकरंजी
  10. अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र)- रावेर

हे ही वाचा…

महाविकास आघाडीवर महायुतीची कुरघोडी, उमेदवार जाहीर करण्यात भाजप अव्वल, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;