विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; समीर भुजबळ शरद पवारांच्या संपर्कात?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; समीर भुजबळ शरद पवारांच्या संपर्कात?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या तुतारी हाती घेण्यासंदर्भात हाचलाची सुरू झाल्या आहेत. किंवा ते अपक्ष निवडणूक देखील लढू शकतात अशी चर्चा सुरू आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढववण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना नेते सुहास कांदे यांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळणार नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेचा असल्यामुळे समीर भुजबळ यांच्याकडून वेगळ्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. समीर भुजबळ हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. समीर भुजबळ हे एकतर तुतारी हाती घेणार किंवा अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठं यश मिळालं. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना कोणत्या आणि किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवारांची यादी प्रसिद्धी होण्यापूर्वीच अनेक इच्छूक हे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा इच्छूकांच्या नाराजीचा फटका हा महायुती आणि महाविकास आघाडी असा दोन्हीकडे देखील बसू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान राजकीय पक्षांपुढे असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;