दाऊद इब्राहिम-शरद पवार भेटीचा मुद्दा का उचलला?…महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?…प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा मोठा हल्ला

दाऊद इब्राहिम-शरद पवार भेटीचा मुद्दा का उचलला?…महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?…प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा मोठा हल्ला

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्ला केला आहे. त्यांनी जुन्या विषयाला पुन्हा फोडणी दिली आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची दुबईत भेट झाली होती, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 1988-1991 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांची दुबईत भेट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. यापूर्वी शरद पवार यांच्यावर हे आरोप झाले आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा हे आरोप झाल्यामुळे विरोधकांनी प्रकाश आंबडेकर जुना मुद्दा उपस्थित करत असल्याचे म्हटले आहे. त्यांना उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. सोशल मीडियावर ट्विट करुन प्रकाश आंबेडकर यांनी हे उत्तर दिले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचा भेटीचा 30 वर्ष जुना मुद्दा मी उपस्थित केल्यामुळे काही लोक प्रश्न विचारत आहे. त्याचे माझ्याकडे सरळ उत्तर आहे. कारण मुंबई आणि देशासमोर धोका आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे मुंबईतील अंडरवर्ल्डच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तो इतिहास पुन्हा समोर आला आहे. सर्वांना माहिती आहे की अंडरवर्ल्डने मुंबईत कोणाच्या मदतीने राज्य केले आहे.

महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच हा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का ? जर नसेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले आहे.

आता येणारी पाच वर्षे मुंबई आणि देशासाठी खूप महत्वाची आहेत. जर अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले तर अंडरवर्ल्ड पुन्हा मुंबईवर राज्य करेल आणि  देशाची सुरक्षा धोक्यात आलेली असेल असेही आंबेडकरांनी नमूद केले.

ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चीनबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मी काल देशासमोर चिंता व्यक्त केली आहे. बाबासाहेबांनी चीनच्या विस्तारवादी योजनांबद्दल सावधान केले होते. परंतु, काँग्रेसने बाबासाहेबांचे ऐकले नाही, त्यानंतर काय झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीचा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का ?असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असे नको असेल, तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;