महाराष्ट्रात जर हरियाणा पॅटर्न लागू करायचा असेल तर…, लक्ष्मण हाकेंनी फडणवीसांना काय दिला सल्ला?

महाराष्ट्रात जर हरियाणा पॅटर्न लागू करायचा असेल तर…, लक्ष्मण हाकेंनी फडणवीसांना काय दिला सल्ला?

हरियाणामध्ये काँग्रेस विजयी होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना राज्यात पक्षाला मोठा फटका बसला. दुसरीकडे मात्र भाजपनं जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. याबाबत बोलताना आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हरियाणा पॅटर्न जर महाराष्ट्रात आणायचा असेल तर त्या पक्षांनी जास्तीत जास्त ओबीसींना संधी दिली पाहिजे. ओबीसींच्या प्रश्नावर बोलावे “जो ओबीसी की बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा” असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

दरम्यान दुसरीकडे  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला देखील मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही जरांगे पाटील ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेत उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबत येत्या वीस ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील मोठी घोषणा करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटलांनी लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे काम केले त्याच पद्धतीने विधानसभेला देखील करणार आहेत. जरांगे पाटील आमदार पाडायचं काम करू शकतील मात्र उभे करण्याचे काम करू शकणार नाहीत असं हाके यांनी म्हटलं आहे.

हाके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. ‘पवार साहेबांनी दाऊद इब्राहिम बरोबर प्रवास केलेल्या घटनेपेक्षा ओबीसीचं अठरा प्रकट जातीच प्रतिनिधित्व डावलण्याचं त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये न आणण्याचं त्यांच्यावर अन्याय करण्याचं मोठं काम पवारांनी केलं. त्यामुळे कसायापेक्षा कलम कसाई वाईटच, त्यामुळे शरद पवार हे दाऊद बरोबर फिरले काय आणि नाही फिरले काय, मात्र त्यांनी आमच्या गाव गड्यातील माणसांच्या घरावर नांगर फिरवलाय,’ असा घणाघातही यावेळी हाके यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;