मोठी बातमी : मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी ठाकरे गट जागा सोडणार?

मोठी बातमी : मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी ठाकरे गट जागा सोडणार?

ठाकरे गट अमित ठाकरे यांच्यासाठी माहिम मतदारसंघ सोडणार असल्याची चर्चा आहे. अमित ठाकरे जर निवडणूक लढवणार असतील तर माहिममध्ये उमेदवार न देण्याच्या ठाकरे गटाच्या हालचाली सुरु आहेत. तसेच वरळीमध्ये मनसे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकते. मनसेच्या बैठकीत माहिममधून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी ठाकरे गट उमेदवार देणार नाही.

अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली तर ही शक्यता आहे. भांडूप, माहिम आणि मागाठाणे या तीन मतदारसंघातून चाचपणी सुरु आहे. अमित ठाकरे यांनी माहिममधून निवडणूक लढवावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. अधिकृतरित्या जर अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली तर शिवसेना ठाकरे गट निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

ठाकरे गटाने व्यापक भूमिका घेतली तर ठाकरे गटातील अमित ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघात पाठिंबा देऊ शकते. माहिममधून सध्या सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गट देखील काय भूमिका घेते याकडे ही सगळ्यांचं लक्ष असेल. याआधी वरळीमध्ये मनसेने मागच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.

बाळासाहेर ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक न लढवता पक्षाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला होता. पण ठाकरे घराण्यातील तरुण पिढीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे.

अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. राज ठाकरे यांनी देखील वरळीत आदित्य ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी ठाकरे गटाची अपेक्षा असेल. वरळीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीन महिन्यापासून तयारी सुरु केली आहे. वरळी व्हिजनच्या माध्यमातून त्यांनी संकल्प चित्र वरळीकरांपुढे मांडलं होतं. संदिप देशपांडे यांनी अनेकदा ठाकरे गटावर टीका केली आहे.

मनसे नेते यशवंत किलेदार यांनी म्हटलं की, मनसेकडून जय्यत तयारी सुरु आहे. माहिममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करु. त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्हाला आनंद आहे. राज ठाकरे साहेब यांनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम असेल असं ही त्यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;