विदर्भावरून घमासान; वाकायचे तर नाही पण मोडायचे पण नाही, डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे रमेश चेन्नीथला ‘मातोश्री’वर
वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड म्हणतात ते काही उगीच नाही. विदर्भातील काही जागांवरून सध्या उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कमालीचे संबंध ताणल्या गेले आहेत. काल महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत त्याचे उग्र पडसाद दिसून आले. विदर्भातील 62 जागांपैकी जवळपास 10 जागांवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि पडदा टाकण्यासाठी आता काँग्रेस हायकमांडचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्याशी या प्रकरणात चर्चा करणार आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे रमेश चेन्नीथला ‘मातोश्री’वर दाखल झाल्याची चर्चा आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List