कोण कुठं लढणार? दादांचं ठरलं; अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

कोण कुठं लढणार? दादांचं ठरलं; अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलं आहे. अशात राज्यातील सगळ्याच भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच अजित पवारांनीही राष्ट्रवादी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी मैदानात उतरलेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.

अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

बारामती – अजित पवार

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवळ

अमळनेर – अनिल पाटील

तुमसर – राजू कारेमोरे

अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे

अहेरी- धर्मारावबाबा आत्राम

पुसद- इंद्रनील नाईक

वसमत- चंद्रकांत नवघरे

कळवण- नितीन पवार

सिन्नर- माणिकराव कोकाटे

निफाड- दिलीप बनकर

देवळाली- सरोज अहिरे

शहापूर- दौलत दरोडा

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

जुन्नर- अतुल बेनके

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

खेड, आळंदी- दिलीप मोहिते

इंदापूर- दत्तात्रय भरणे

मोहोळ- यशवंत माने

मावळ- सुनील शेळके

वाई- मकरंद पाटील

चिपळूण- शेखर निकम

पिंपरी- अण्णा बनसोडे

वडगाव शेरी- सुनील टिंगरे

चंदगड- राजेश पाटील

हडपसर- चेतन तुपे

अकोले- किरण लहामटे

करमाळा- संजय शिंदे

मोर्शी- देवेंद्र भुयार

कोपरगाव- आशुतोष काळे

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

माजलगाव- जयसिंह सोळंके

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

अणुशक्तीनगर- सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक

अमरावती शहर- सुलभा खोडके

इगतपुरी- हिरामण खोसकर

 

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

राजधानी दिल्लीत महायुतीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजप 155 जागा लढणार आहे. शिवसेना शिंदे गट 78 जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;