मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले…; शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी

मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले…; शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार? याची संभाव्य यादी समोर आली आहे. यात बारामतीतून कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण इतर जागांवरील उमेदवारांची नावं समोर आली आहेत. 40 हून जास्त जागांवर शरद पवार कुणाला उमेदवारी देणार? याची संभाव्य यादी…

शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

इस्लामपूर- जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

शिराळा- मानसिंग नाईक

उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

कोरेगाव- शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

माण खटाव- प्रभाकर देशमुख

शिरुर- अशोक पवार

जुन्नर- सत्यशील शेरकर

इंदापूर- हर्षवर्धन पाटील

आंबेगाव- देवदत्त निकम

वडगाव शेरी- बापू पठारे

दौंड- रमेश आप्पा थोरात

माळशिरस- उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड- रोहित पवार

काटोल- अनिल देशमुख

विक्रमगड- सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड- संदीप क्षीरसागर

मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

जिंतूर- विजय भांबळे

अहेरी- भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर- सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व- राखी जाधव

परळी- राजाभाऊ पड

लक्ष्मण पवार- गेवराई

आष्टी- भीमराव धोंडे

केज- पृथ्वीराज साठे

माजलगाव- रमेश आडसकर

राहुरी- प्राजक्त तनपुरे

देवळाली- योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाळ

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

जामनेर- गुलाबराव देवकर

अकोला- अमित भांगरे

पारनेर- राणी लंके

खानापूर – सदाशिव पाटील

चंदगड- नंदाताई बाभूळकर

इचलकरंजी- मदन कारंडे

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झालं असल्याचं चित्र आहे. काही जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून वाद सुरु आहे. याचा परिणाम शरद पवार गटाच्या उमेदवार यादीवर झाला आहे. शरद पवार गटाची उमेदवारी यादी आज येणार होती. परंतू शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रसमधील वादामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;