Baba Siddiqui Death : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस खात्यातच पहिली कारवाई, सर्वात मोठी अपडेट काय?

Baba Siddiqui Death : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस खात्यातच पहिली कारवाई, सर्वात मोठी अपडेट काय?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आज 8 दिवस उलटले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून सिद्दीकी यांची सलमानशी जवळीक असल्यानेच त्यांना टार्गेट करून संपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.याप्रकरणी पोलिसांनी चौघांन अटक केली असून रोज नवनवे खुलासे होत आहेत.

दरम्यान सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळेच कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी रात्रीर सिद्दीकींच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी सोनावणे हेच सिद्दीकींसोबत होते. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती.

बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कालच पोलिसांनी जबाब नोंदवला. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेतला. मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

न्याय हवा, सिद्दीकी कुटुंबियांची मागणी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. झिशान यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली.  “ लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना माझ्या वडिलांनी जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं होतं.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;