Ghatkopar West : जनता जनार्दन ‘रामा’ला पावणार की नवीन चेहऱ्यासाठी मतदारांचा ‘कदम’ताल? घाटकोपर पश्चिममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी समीकरणं काय?

Ghatkopar West : जनता जनार्दन ‘रामा’ला पावणार की नवीन चेहऱ्यासाठी मतदारांचा ‘कदम’ताल? घाटकोपर पश्चिममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी समीकरणं काय?

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अजूनही सुरू झालेली नाही, पण जागा वाटपावरून युती आणि आघाडीत खटके उडल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीत तर आज घमासान झाल्याचे दिसले. तरीही काही मतदारसंघात चित्र वेगळं आहे. या मतदार संघात एकट्या उमेदवाराच्या जीवावर पक्षाला सहज विजय मिळाल्याचे दिसून येते. काही मतदारसंघात उमेदवारांनी हॅटट्रिक आणि डबल हॅटट्रिक केल्याचे दिसून येते. घाटकोपर पश्चिम मतदारसंघात राम कदम यांनी असा करिष्मा साधला आहे. आता चौथ्यांदा त्यांची वाट बिकट दिसत आहे. जनता जर्नादन या रामाला राजकीय वनवासात पाठवतात की पुन्हा एकदा चौकर ठोकतात हे दीड महिन्यात समोर येईल.

लोकसभेत फसले समीकरण

मराठवाड्याप्रमाणेच मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे गणित फसलं. त्यांना मोठी आघाडी घेता आली नाही. मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच मुंबई ईशान्य मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला नाही. घाटकोपर पश्चिम आणि पूर्वी, मानखूर्द, भांडूप पश्चिम, मुलुंड, विक्रोळी या पट्ट्यात मराठी भाषिक, गुजरात-राजस्थानी मतदार असताना सुद्धा लोकसभेत भाजपला खातं उघडता आलं नाही. ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. या भागात मराठी मतदारांचा टक्का 45 टक्के आहे. तर गुजराती-राजस्थानी मतदार 13 टक्क्यांचा घरात आहे. मुस्लीम, उत्तर भारतीय यांची टक्केवारी चांगली आहे. राम कदम यांचा घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ याच पट्ट्यात येतो.

राम कदम यांनी साधली हॅटट्रिक

घाटकोपर पश्चिम मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून येथे राम कदम यांचा बोलबाला राहिला आहे. 2009 साली ते पहिल्यांदा मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. तर त्यापुढील निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवल्या. त्यात त्यांनी विजयश्री खेचून आणला. या मतदारसंघात 2.73 लाख मतदार आहेत. त्यात 1.70 लाख म्हणजे जवळपास 75 टक्के मतदार हा मराठी भाषिक आहे. तर उर्वरीत मतदारात गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिमांचा वरचष्मा आहे. राम कदम यांनी त्यांच्या मतदार संघाची चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे त्यांना या मतदार संघात अद्याप धक्का लागलेला नाही. पण 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 मध्ये मतांची बेगमी कमी झाल्याचे दिसते. त्यांचे मताधिक्य दहा हजारांनी कमी झाल्याचे आकडे बोलतात.

काय आहेत समीकरणं

सध्या महाविकास आघाडीने या मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महाविकास आघाडीत अनेक जण इच्छुक आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून अमोल मातेले, उद्धव ठाकरे गटाचे इम्रान शेख, संदीप भालेराव यांच्यासह इतर काही जण इच्छुक असल्याचे समजते. तर राम कदम यांना भाजप तिकीट देणार का? याकडे पण काहींचे लक्ष लागले आहे. भाजपमधून इतर काही जण या मतदार संघासाठी इच्छुक असल्याचे समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना 55.90 टक्के मतं मिळाली होती. घाटकोपर त्यांच्यासाठी बोनस ठरला होता. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी या मतदारसंघासाठी जोर लावणार हे निश्चित आहे. त्यामुळे राम कदम यांची वाट बिकट आहे हे नक्की.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;