… म्हणून मी हर्ट झाले; रुपाली ठोंबरे पाटील यांचा रोख कुणाच्या दिशेने?

… म्हणून मी हर्ट झाले; रुपाली ठोंबरे पाटील यांचा रोख कुणाच्या दिशेने?

लाडक्या बहि‍णींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राज्यात गुलाबी मोहीम राबवली. जनसंवाद यात्रेच्या रुपाने अजितदादांनी उभा आडवा महाराष्ट्र पालथा घातला. लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवळणी आम्हीच कशी दिली यासाठी दादा गटाने महाराष्ट्र पिंजून काढला. पण दादा गटातील दोन बहिणींची नाराजी जाहीर झाल्याने त्यावर आता कसा तोडगा काढावा असा पेच पक्षातील वरिष्ठांना पडला आहे. काय आहे या नाराजीचे कारण? का होत आहे एक व्यक्ती एक पदाची मागणी?

रुपाली पाटील ठोंबरे नाराज का?

मी आधी सुद्धा मुद्गा मांडला होता इतर ही पक्षात लाडक्या बहिणी आहेत. परंतु एक व्यक्ती एक पद देण्यात यावं. काल मला चाकणकर बोलल्या की मी बाहेरची आहे, त्यामुळे हर्ट झाले. मग मी जाते बाहेर. मात्र दादा मला बोलले की मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा. मला दादांवर अभिमान की आम्ही 121 त्यांना तक्रार करू शकता. एवढा जर मोठे नेते बोलत असतील नाराज नव्हते मात्र एक खंत होती की मी बाहेरची यावर दादा बोलले. मानकर यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली, दादा यावर नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्ती केला.

वाद नाही, पण गैरसमज आहेत

रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात दादा गटात धुसफूस सुरू असल्याचे सध्या तरी चित्र समोर येत आहे. एक पद एक व्यक्ती अशी ठोंबरे यांनी मागणी केल्यापासून हा वाद वाढल्याचे समोर आले आहे. त्यावर ठोंबरे यांनी त्यांचे म्हणणे मांडले. मी पुन्हा सांगते मी त्यांचं अभिनंदन केलं. महिला आयोगाविषयी काही म्हणणंचं नाही मात्र त्य़ा अंगावर ओढून घेत आहेत, असे ठोंबरे म्हणाल्या.

पक्षाने एक पद एक व्यक्ती असं धोरण करावं, अशी पुन्हा ठोंबरे यांनी मागणी केली. त्यांना नक्की काय अडचण आहे हे त्यांनी सांगावं, असं आवाहन त्यांनी चाकणकर यांना केले आहे. मी मागच्या वेळेस कसबा मधून तिकीट मागितलं होतं. आता तर महायुती आहे त्यामुले आता किती पुलाखालून पाणी जाईल काय माहिती. हा वाद नसून तो त्यांचा गैरसमज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मला त्यांच्याशी बोलायची गरज वाटली नाही, असे ही त्या म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;