झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी

झिशान सिद्दीकी तातडीने सागर बंगल्यावर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, वडीलांच्या हत्येनंतर केली ही मोठी मागणी

माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे.

सागर बंगल्यावर मोठी घडामोड

थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या सर्वच प्रकरणासह वेगवान राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.

आम्हाला न्याय हवा

झिशान सिद्दीकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीत, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसंबंधीच्या तपासाची इत्यंभूत माहिती देण्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची धागेदोर कुठंपर्यंत आहेत, याविषयी उहापोह झाल्याचे समजते. दरम्यान झिशान यांनी याप्रकरणात न्याय देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानचे जवळचे मित्र असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगशी संबंधित काही जणांनी समाज माध्यमांवर केला आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपपत्र

सलमान खान गोळीबार प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर इतरांसह रेकी केल्याच्या आरोपावरून नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी हरियाणातील एका व्यक्तीला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुखबीर बलबीर सिंग उर्फ ​​सुखा असे आहे, तो शस्त्रास्त्र पुरवठादार होता आणि तो शस्त्रे घेण्यासाठी पाकिस्तानस्थित डोगर या व्यक्तीच्या संपर्कात होता.

सुखा पानिपतमधील एका हॉटेलमध्ये लपला होता आणि त्याने केस आणि दाढी वाढवून आपला लूक बदलला होता. पनवेल रेकी ऑपरेशनमध्ये १६-१७ जणांचा सहभाग होता, त्यापैकी ४ जण जूनमध्ये अटक करण्यात आली होती. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले होते की, आरोपींना 25 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि पाकिस्तानकडून शस्त्रे आणायची होती.

आरोपपत्रात म्हटले आहे की बिश्नोई टोळीने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा अभिनेता त्याचे पनवेल फार्महाऊस सोडत असताना खून करण्यासाठी 25 लाख रुपयांचा करार जारी केला होता. ही योजना ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत रचण्यात आली होती. या टोळीने पाकिस्तानकडून AK-47, AK-92, M16 रायफल्स आणि तुर्की बनावटीची झिगाना पिस्तूल यासह प्रगत शस्त्रे मिळविण्याची योजना आखली होती. या टोळीने बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, कश्यप, भाटिया, चीना आणि जावेद खान यांच्यासह १५-१६ सदस्यांसह व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संवाद साधला. सुखा आणि डोगर हे पाकिस्तानचे आहेत, जिथे ते शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारे म्हणून काम करतात, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;