Borivali VidhanSabha : बोरिवलीत भाजपा वेगळी चाल खेळण्याच्या तयारीत, विद्यमान आमदाराचं तिकीट कापणार का?

Borivali VidhanSabha : बोरिवलीत भाजपा वेगळी चाल खेळण्याच्या तयारीत, विद्यमान आमदाराचं तिकीट कापणार का?

बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाप्रमाणे बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी सुरक्षित मानला जातो. बोरिवलीमध्ये मराठी आणि गुजराती मतदारांची भूमिका निर्णायक आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघ मागच्या 20 वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपाने मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत दोन वेगवेगळ्या उमेदवारांना संधी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दोनवेळचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून त्यांच्याजागी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. पियुष गोयल यांनी अगदी आरामात लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपाने अशाच दोन वेगवेगळ्या उमेदवारांना उमेदवारी दिली. त्यावेळी सुद्धा यश मिळालं.

यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं. त्यावेळी ते नाराज झाल्याची चर्चा होती. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांच्याशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने सुनील राणे आमदार आहेत. 2019 मध्ये सुनील राणे यांना तब्बल 123,712 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर 95,021 च्या मताधिक्क्याने मात केली होती. त्यांच्याआधी भाजपाने सुरक्षित मतदारसंघ म्हणून विनोद तावडे यांना संधी दिली. विनोद तावेड यांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यांनी सुद्धा मोठ्या फरकाने विजय मिळवलेला. तावडेंच्या आधी गोपाळ शेट्टी इथून आमदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राम नाईक यांच्याजागी गोपाळ शेट्टींना संधी दिली. दोन्हीवेळा शेट्टी मोठ्या मताधिक्क्याने निवडून लोकसभेवर गेले.

बोरिवलीत उमेदवारी कोणाला?

आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. याचा अर्थ सुनील राणे यांचा पत्ता कट होणार. विधानसभेला पुन्हा संधी देऊन गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कारण प्रस्थापित सरकार विरोधी लाट असताना गोपाळ शेट्टी यांची नाराजी भाजपाला परवडणारी नाही. गोपाळ शेट्टी यांचा बोरिवली विधानसभा मतदारसंघात तगडा जनसंर्पक आहे. गोपाळ शेट्टी मविआकडे वळले तर फटका बसू शकतो. त्यामुळे सद्य स्थितीत हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याची भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून पुन्हा एकदा गोपाळ शेट्टींना संधी मिळण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;