गुलाबी जॅकेट नाही तर गुजरातच्या गुलामगिरीची झुल; शरद पवारांच्या शिलेदाराचा अजितदादांवर हल्लाबोल

गुलाबी जॅकेट नाही तर गुजरातच्या गुलामगिरीची झुल; शरद पवारांच्या शिलेदाराचा अजितदादांवर हल्लाबोल

सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. या मेळाव्यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दमदार भाषण केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. ‘जनसन्मान यात्रे’वेळी अजित पवार गुलाबी जॅकेट घालतात. त्यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

अजित पवारांबाबत काय म्हणाले?

मला पूर्ण खात्री पटली आहे उशीर झाला. असला तरी आता तुमचे घड्याळाकडे लक्ष नाही. उमेदवार तगडा आहे म्हणून चालत नाही. सर्व एकजुट झाले तर निकाल वेगळा येईल. शर्ट चप्पल विकत घेऊ शकतो पण प्रथमच महाराष्टाने नेते विकत घेतले जात आहेत. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

अमोल कोल्हेंचा महायुतीवर निशाणा

वाई परिसरात शिवप्रेमी आहेत. साडे तीनशे वर्ष किल्ले सिंधुदुर्ग टिकतो. मात्र छत्रपतीचा पुतळा टिकत नाही हे दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले या बाबत टेबल न्यूज म्हणुन सर्वत्र सांगितले जात आहे. आचारसंहितेच्या तोंडावर घोषणा देऊन चालत नाही, असं अमोल कोल्हे म्हणालेत. उठा उठा दिवाळी निवडणूक आली आणि गद्दारांना घरी पाठवण्याची वेळ झाली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनीही या मेळाव्यात भाषण केलं. नेते कुठेही गेले तरी जनता शरद पवार यांच्यासोबत आहे. पक्ष फोडायची नाही तर पक्ष चोरायची पध्दत महाराष्ट्रात सुरु झाली आहे. सर्वच प्रकल्प गुजरातला न्यायचे असतील तर मते देखील गुजरातला मागा.. अजित दादांविषयी आपण कधीच बोलत नाही. पण जाणाऱ्यांचा एकच नारा तुरुंगा पेक्षा भाजप बरा आहे… अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेवर बोलू नये. कारण दादांनी आपल्या बहिणीचा विचार केला नाही, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;